अल्पवयीन बालकाने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

शहरातील मोठी आळी परिसरातील बजरंग चौकातील नयन बाळ बारगळ (वय 11) या अल्पवयीन बालकाने शुक्रवारी (ता.चार) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

खुलताबाद (जि.औरंगाबाद ) ः शहरातील मोठी आळी परिसरातील बजरंग चौकातील नयन बाळ बारगळ (वय 11) या अल्पवयीन बालकाने शुक्रवारी (ता.चार) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मोठी आळी येथील बजरंग चौकात बारगळ कुटुंबीय राहते. ते नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात निघून गेले होते. नयन हा घरीच थांबला होता. त्याने घरातील रॅकला साडी बांधून आपली जीवनयात्रा संपविली. अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबीय हवालदिल झाले.
---


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor Child Committed Suicide