अल्पवयीन मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून काढण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

लातूर - येथील शिवाजी चौकात एका चारमजली इमारतीवर जाऊन खाली पाय सोडून रडत बसलेल्या एका बारावीतील मुलीला खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले आहे. ही मुलगी इमारतीवर जाऊन बसल्याने ती आत्महत्या करू शकते, असा संशय होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी रात्री उशिरापर्यंत मुलीचे समुपदेशन केले. 

येथील शिवाजी चौकात सुभाष सोमाणी यांच्या चारमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी (ता.१०) रात्री नऊच्या सुमारास एक मुलगी या इमारतीवर पळत गेली. चौथ्या मजल्यावर इमारतीच्या मागच्या बाजूला जाऊन तिने खाली पाय सोडले. वॉचमनने याची सुभाष सोमाणी यांना माहिती दिली. श्री. सोमाणी यांनी तातडीने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस पथक, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आधी पोलिसांनी इमारतीच्या खालच्या बाजूला जाळ्या लावून घेतल्या. त्यानंतर बराच वेळ पोलिस रस्त्यावरून या मुलीशी बोलत राहिले. मुलीने पोलिसांना एक मोबाईल नंबरही दिला. त्यावर फोन करून व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवा, असेही ती म्हणत होती. काही पोलिस इमारतीवर गेले. साडेदहाच्या सुमारास तिला खाली आणण्यात पोलिसांना यश आले. ही मुलगी अहमदनगर जिल्ह्यातील असून ती येथे शिक्षणासाठी आली आहे. ती एका वसतिगृहात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला आहे.

Web Title: Minor Girl Life Saving Police