विश्‍वसुंदरी बनण्याचे स्वप्न साकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

औरंगाबाद - 'मिसेस इंडिया ब्यूटिफुल स्किन-२०१८’ हा किताब मिळाल्याने विश्‍वसुंदरी बनण्याचे स्वप्न साकार झाल्याचे जोत्स्ना काटेकर यांनी बुधवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत सांगितले. या कमाईतून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक आधार देणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

औरंगाबाद येथील जोत्स्ना काटेकर यांना ता. तीन मेरोजी जयपूर येथे हा किताब मिळाला. 

जयपूर येथे ‘आर्चज्‌ मिसेस इंडिया सीजन-२’ तर्फे आयोजित या स्पर्धेसाठी भारतातील २० राज्यांतून ४० महिलांची निवड झाली होती. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील महिलांनी सहभाग नोंदविला होता. ‘खरे तर मी ४० मध्ये निवडले गेले, त्यातच समाधानी होते; कारण माझे तेही स्वप्न याआधी पूर्ण झाले नव्हते, यावेळी ते पूर्ण झाले. ग्वाल्हेर येथील माझी मैत्रीण दीपाली, माझी सासू यांनी पुढील तयारीसाठी मार्गदर्शन केले,’ असे त्या म्हणाल्या.  

शेतकरी आत्महत्येनंतर त्या कुटुंबातील स्त्रियांची अवस्था बिकट होते. त्यांच्यासाठी मला काम करावयाचे आहे. माझ्या क्षमतेनुसार मला त्यांचे संसार उभे करावयाचे आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना संसारात उपयोगी पडून त्यांच्यात पुन्हा जगण्याची उमेद जागवायची असल्याचे ज्योत्सना यांनी सांगितले.

महिला सशक्‍तीकरणावर सादरीकरण 
पहिल्या पाचमध्ये जोत्स्ना यांची निवड झाली. महिला सशक्‍तीकरणावर सादरीकरणात प्रामुख्याने महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांवर प्रकाश टाकला. त्यावर काही उपायही सुचविले. त्यांचे विचार परीक्षकांना भावले होते.

शेतकऱ्यांचे संसार पुन्हा उभे करणार
आपण मूळ विदर्भातील आहोत, हे सांगताना जोत्स्ना म्हणाल्या, की विदर्भात सातत्याने पडणारा दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर येतो, मुलांचे शिक्षण थांबते. हे सर्व थांबविण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्यांच्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: misses india beautiful skin 2018 jotsna katekar