पोलिस महासंचालकांनी उरकली मिटमिटा प्रकरणाची चौकशी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबाद - मिटमिट्यात कचरा प्रश्‍नावरून झालेल्या राड्यानंतर पोलिसांकडून दगडफेक व बेदम मारहाणीचे प्रकार घडले. या प्रकारानंतर पोलिस महासंचालक व राज्याचे अप्पर गृहसचिव यांच्या समितीकडून या प्रकरणात एक महिन्यात चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; परंतु या आदेशाला काही दिवस हरताळ फासल्यानंतर महासंचालक उशिराने शहरात आले. एवढे होऊनही त्यांनी घटनास्थळी जाणे सोडाच, चौकशी गुंडाळून थातूर मातूर आश्‍वासने गावकऱ्यांना दिली.

मिटमिटा येथे कचरा प्रश्‍नावरून सात मार्चला मोठा हिंसाचार झाला होता. यात चाळीसपेक्षा अधिक वाहने, घरातील साहित्याची नासधूस करून पोलिसांनी दगडफेक व दडपशाही केली होती. ‘माणुसकीचा कचरा’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने हा प्रश्‍न लावून धरला. यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून पोलिस महासंचालक सतीश माथूर व अप्पर गृहसचिवांमार्फत एक महिन्यात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते; परंतु तब्बल तीन महिन्यांनंतर या समितीला जाग आली. राज्याचे लक्ष लागून असलेल्या या चौकशीसाठी महासंचालक निवृत्त होण्याच्या काही दिवसच शिल्लक असताना एकटेच शहरात आले. घटनास्थळी जाण्याऐवजी त्यांनी महानिरीक्षक कार्यालयात ठाण मांडत मिटमिटावासीयांनाच कार्यालयात बोलावले. त्यांची बाजू ऐकून घेत जखमी पोलिस, महापालिकेचे कचरा गाडीवरील चालक, अग्निशामक दलाच्या जवानांची बाजू ऐकून चौकशीचा सोपस्कार पार पाडला. 

निमित्त ‘स्नेहमिलना’चे 
तीन महिन्यांनंतर महासंचालक सतीश माथूर शहरात आले. खास बाब ही की, त्यांना सेवानिवृत्तीचा निरोप म्हणून स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्तानेच ते शहरात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. या कामात काम म्हणून मिटमिट्यातील चौकशीचे कामही त्यांनी उरकल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mitmita case inquiry satish mathur