esakal | BIG NEWS : कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडल्यानंतर 'अभिमन्यूंची' प्लाझ्मा डोनेटची प्रतिज्ञा
sakal

बोलून बातमी शोधा

abhimanyu pawar.jpg

कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडल्यानंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी इतर रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून आता प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनावर मात करून आल्यानंतर लगेच असा निर्णय घेणारे श्री. पवार हे मराठवाड्या्तील पहिले लोकप्रतिनिधी आहेत. लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

BIG NEWS : कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडल्यानंतर 'अभिमन्यूंची' प्लाझ्मा डोनेटची प्रतिज्ञा

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडल्यानंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी इतर रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून आता प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनावर मात करून आल्यानंतर लगेच असा निर्णय घेणारे श्री. पवार हे मराठवाड्या्तील पहिले लोकप्रतिनिधी आहेत. लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात गेल्या काही महिन्यात श्री. पवार हे आपल्या मतदारसंघात रात्रंदिवस फिरत होते. या रोगापासून नागरीकांचे प्रबोधन करण्यासोबतच ते धीरही देत होते. हे करीत असतानाच दहा दिवसापूर्वी श्री. पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. तातडीने त्यांना येथील विलासकराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुणे किंवा मुंबईतून उपचार घ्यावे असा सल्ला अनेकांनी त्यांना दिला होता.  पण येथील डॉक्टर व उपचार पद्धतीवर विश्वास दाखवत याच संस्थेत उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडयावर आपण चांगले असल्याचे सांगितल्याने मतदारसंघातील नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. 

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली  
गेली दहा दिवस त्यांच्यावर येथेच उपचार सुरु होते. संस्थेत उपचारासाठी दाखल असताना त्यांनी आपल्या अंगातील कार्यकर्ता मरू दिला नाही. इतर रुग्णांजवळ जावून त्याची चौकशी करण्यासोबतच त्यांना धीर ते देत होते. याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. गुरुवारी (ता.१६) त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. 
यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागतही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हेही उपस्थित होते.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर संबंधीत रुग्णांनी प्लाझ्मा डोनेट करावा असे आवाहन सातत्याने केले जात आहे. यामुळे इतर रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे श्री. पवार यांनी कोरोनातून मुक्त झाल्यानंतर लगेच दुसऱया दिवशी आपले कर्तव्य समजून प्लाझ्मा ड़ोनेट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संबंधीत विभागाकडे प्लाझ्मा डोनेट करण्याची तारीखही त्यांनी मागितली आहे. असा निर्णय घेणारे श्री. पवार हे मराठवाड्यातील पहिले लोकप्रतिनिधी आहेत.

ज्योतिरादित्य शिंदेंची प्रेरणा

भारतासह अनेक देशांनी प्लाझ्मा थेरेपी या उपचार पद्धतीचा कोरोना विरोधातील लढाईसाठी वापर सुरु केला आहे. खास करून क्रिटिकल पेशेंट्स बरे करण्यासाठी याचा स्वीकार केला आहे. या उपचार पध्दतीच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब ही केले आहे. एका डोनरमुळे २ ते ५ गंभीर रूग्ण कोरोना मुक्त होऊ शकतात.  प्लाझ्मा् डोनेट केले तर  कोरोनाचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो . कदाचित शुन्याच्याही जवळ येऊ शकतो. मध्यप्रदेशातील भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोरोनातून मुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेट केले. त्यांचे फोटो मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोशल मीडिआवर शेअर केले होते. श्री. शिंदे यांची प्रेरणा घेवून आपण प्लाझ्मा डोनेट करीत आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा डोनेट करावा. इतरांना यातून जीवदान देण्यास मदत होणार आहे.

आ. अभिमन्यू पवार (औसा, जि. लातूर)

(संपादन : प्रताप अवचार)