शिवसेनेने दिला भाजपला चकवा, आमदार सावे नाराज 

atul save
atul save

औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर शिवसेनेने भाजप पदाधिकाऱ्यांना अचानक "चकवा' दिला. त्यामुळे आमदार अतुल सावे यांना धावपळ करत खैरे यांच्या मागे यावे लागले. सावे यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली व कार्यक्रमानंतर दोघांत दिलजमाईही झाली. 

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी राज्याप्रमाणे शहरातही शिवसेना-भाजपनेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. विशेषतः विकास कामावरून दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमकी उडाल्या. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर नेत्यांमधील भांडणे थांबतील अशी चर्चा होती. मात्र शनिवारी पुन्हा एकदा खासदार खैरे व आमदार सावे यांच्यात "तू तू-मै मै' झाली. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणे व चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन खासदार खैरे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आले होते.

त्यानुसार महापालिका व भाजपचे आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास महामंडळाचे डॉ. भागवत कराड दहा वाजेच्या सुमारास कार्यक्रमस्थळी आले. खैरे मात्र 11 वाजता आले. येथील कार्यक्रम संपल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढील कार्यक्रमासाठी संत एकनाथ रंग मंदिरात एसी बसविण्याच्या कामाचे उद्‌घाटन करण्यासाठी या, असा निरोप भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. सावे, कराड, शिवसेनेचे स्थायी समिती सभापती राजू वैद्य रंगमंदिरात पोचले. अर्धा तास वाट पाहिल्यानंतरही खैरेसह इतर पदाधिकारी त्या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे सावे यांनी फोन करून विचारणा केली असता, सेव्हनहिल येथील माहेश्‍वरी समाजाच्या स्वच्छतागृह उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर सावे संतप्त झाले. त्या कार्यक्रमाचे मलाही निमंत्रण आहे. आम्हाला इकडे पाठवून तुम्ही माझ्या मतदारसंघात गेलात का? अशी विचारणा सावे यांनी केली. त्यावर खैरेंनी सावरासावर करत या इकडे, तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम सुरू करणार नाही, असे सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com