आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यांच्या जिल्हा न्यायालयाच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या अपिलाच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांनी आमदार जाधव यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. तसेच त्यांच्या शिक्षेला अपिलाच्या निकालापर्यंत स्थगिती दिली. 

पोलिस मारहाण प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आमदार जाधव यांनी खंडपीठात आव्हान दिले. शिक्षा रद्द करावी आणि खटला संपेपर्यंत जामीन द्यावा, अशी विनंती करण्यात आली होती. हा खटला गंभीर स्वरूपाचा असून, शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार असल्याने जामीन देऊ नये, असे म्हणणे सरकारी पक्षाने मांडले; तर गंभीर गुन्ह्याच्या आरोपातून आमदार जाधव यांना जिल्हा न्यायालयाने मुक्त केलेले आहे, केवळ शासकीय सरकारी कामात अडथळा या कलमान्वये शिक्षा सुनावली. त्यामुळे जामीन देण्याची विनंती ऍड. अभयसिंह भोसले यांनी केली. 

Web Title: MLA Harsh Vardhan Jadhav bail