माजी नगरसेवक गवळींची तुळजापूरमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

तुळजापूर - येथील माजी नगरसेवक नारायण विठ्ठल गवळी (वय ४३) यांनी सोमवारी (ता. ३०) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. 

येथील हडको वसाहतीसमोरील विश्वासनगर भागात गवळी यांचे घर आहे. घरात सकाळी दहाच्या सुमारास नारायण गवळी यांनी आत्महत्या केल्याचे आढळले. घरातील खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेतलेल्या स्थितीत ते होते. यासंदर्भात त्यांचे मेव्हणे नागनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पोलिसांत घटनेची नोंद झाली.

यासंदर्भात पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सांगितले, आत्महत्येपूर्वी नारायण गवळी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यांच्या घरात सापडली. ‘माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये, माझ्या कुटुंबीयांचा विनोद गंगणे यांनी सांभाळ करावा’ अशा आशयाचा उल्लेख या चिठ्ठीत आहे. 

नारायण गवळी यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गवळी हे २०११ ते २०१६ या कालावधीत नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते होते. त्यांच्या पत्नी भारती गवळी या २००६ ते २०११ या कालावधीत नगरसेविका होत्या. नगराध्यक्ष म्हणून भारती गवळी यांनी काम पाहिले. सध्याही त्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. पालिकेच्या राजकीय क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून नारायण गवळी यांचा दबदबा होता. विविध गणेश मंडळांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. शहरात मोफत पाणीवाटपाचेही काम त्यांनी केले. त्यांनी आत्महत्या केल्याचे कळताच हळहळ व्यक्त झाली. अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.

Web Title: mla narayan gawali suicide