राजेश टोपे यांना विधानसभेतील 'उत्कृष्ट भाषण पुरस्कार'

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

वडीगोद्री ( जालना) : अंबड व घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजादरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण केले. सभागृहासमोर प्रश्न मांडून सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केले.

आमदार टोपे यांची 2015 ते 2018 या कालावधीत उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, संसदीय प्रधान सचिव अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने आमदार राजेश टोपे यांना उत्तम संसदपट्टू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Web Title: mla rajesh tope received the best speech award in the legislative assembly