प्रादेशिक वैद्यकीय आरक्षण रद्द करण्यासाठी आमदारांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

परभणी :  वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेता प्रादेशिक आरक्षण 70-30 चा फॉर्मुला रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी (ता. 26) आमदार डॉ. राहूल पाटील यांनी मराठवाड्यातील सहकारी आमदारांसमवेत मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.

सर्व मरठवाडा आमदार एकत्र येवुन आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृवाखाली 70-30% वैद्यकीय शिक्षण मराठवाडा अन्याय दुर करण्याची मागणी आमदार डॉ. राहूल पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार डी.पी.सावंत यांनी आंदोलन केले. विधानसभेच्या बाहेर व आत पावसाळी अधिवेशना दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय प्रवेशाचा 70-30% या सविधान बाहय अरक्षणामुळे विद्यार्थांवर अन्याय होत आहे.  त्यामुळे दर वर्षी मराठवाडा विभागातील सर्व वर्गातील गुणवंता असुन जवळ पास 500 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासुन वंचीत राहतात. या करीता सर्व पालक वर्ग मराठवाडा  एकत्र येणे खुप गरजेचे आहे असे आवाहन आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA s agitation at Vidhansabha for medical reservation