नगरपालिका कर्मचाऱ्यास मारहाण; आमदार भांबळेंविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

जिंतूर नगरपालिकेचे कर्मचारी दत्तराव विश्वनाथ तळेकर यांच्या कडे कर विभागाचा कार्यभार आहे. शहरातील एकलव्य शाळेची नळपट्टी व घरपट्टी वसूलीसाठी आमदार विजय भांबळे यांनी श्री.तळेकर यांना शुक्रवारी घरी बोलावून घेतले होते.

जिंतूर : नगरपालिकेच्या घरपट्टी व नळपट्टी वसुलीसाठी दबाव टाकत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांनी घरी बोलावून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.5) दुपारी घडली. या प्रकरणी रात्री साडेदहा वाजेपर्यत जिंतूर पोलिस ठाण्यात गोंधळ सुरु होता. रात्री उशिरा आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतूर नगरपालिकेचे कर्मचारी दत्तराव विश्वनाथ तळेकर यांच्या कडे कर विभागाचा कार्यभार आहे. शहरातील एकलव्य शाळेची नळपट्टी व घरपट्टी वसूलीसाठी आमदार विजय भांबळे यांनी श्री.तळेकर यांना शुक्रवारी घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांच्यावर या कामासाठी दबाव टाकण्यात आला असे तळेकर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

या कामासाठी आमदार विजय भांबळे यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात कलम353, 332 व 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vijay Bhangle arrested for beaten government employee