महापालिका गेटला ठोकले मनसेने कुलूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे दुपारी वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांना वरिष्ठ अधिकारी किंवा पदाधिकारी कुणीही सामोरे गेले नाही. असे असले तरी अधिकारी कर्मचारी मागच्या दाराने अधिकारी कार्यालयात गेल्याने महापालिकेचे कामकाज सुरू आहे.

औरंगाबाद : औरंगपुरा भागातील कचरा उचलला जात नसल्याच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी (ता. ७) सकाळपासून महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संतप्‍त कार्यकर्त्यांनी 10 वाजेपासूनच मुख्य प्रवेशद्वारात बसून आत ये जा करण्यास मज्जाव केला आहे व गेटलाही कुलूप ठोकण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी औरंगाबादच्या दौर्‍यावर आहेत. त्यात मनसेने आक्रामक आंदोलन पुकारल्यामुळे  प्रशासनाची गोची झाली आहे.

वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे दुपारी वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांना वरिष्ठ अधिकारी किंवा पदाधिकारी कुणीही सामोरे गेले नाही. असे असले तरी अधिकारी कर्मचारी मागच्या दाराने अधिकारी कार्यालयात गेल्याने महापालिकेचे कामकाज सुरू आहे.

Web Title: MNS agitation in Aurangabad