राज ठाकरे सादर करणार विकासाची ब्ल्यू प्रिंट

प्रकाश बनकर
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

राजकीय प्रवेश 
नवनवीन विषयावर आवाज उठविणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच नवीन कार्यकारिणी आणि नियुक्‍त्याचेही कामे या दौऱ्यातून करण्यात येणार आहे. औरंगाबादेतही गुरुवारी सकाळी आकारा वाजता सुभेदारी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.यासह नवीन नियुक्‍त्या देण्यात येणार आहे. नव्या नियुक्‍ती मध्ये शिवसेनेचे माजी महापौर, माजी उपमहापौर, एक विद्यामान अपक्ष नगरसेविका, आणि अन्य पक्षातील लोकांचा प्रवेश होणार आहे. या प्रमुख पक्षातून येणाऱ्यांची नावे गुपीत ठेवण्यात आली आहे. ती पक्ष प्रवेशानंतरच जाहिर केली जाणार असल्याचेही मनसेचा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

औरंगाबाद : आगामी 2019ची लोकसभा-विधानसभा निवडणूकीची मोर्चे बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे व्हिजन 2020 घेऊन राज्याचा दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेतून यांची सुरुवात होणार असून या दौऱ्यातून विकासाची ब्ल्यू-प्रिंटचे राज ठाकरे सादरीकरण करणार आहे. गुरूवारी (ता.30) शहरातील विविध क्षेत्रातील नामांकित 200 व्यक्‍तींसह मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर "व्हिजन औरंगाबाद' विषयी ते संवाद साधणार आहेत. 

मनसे अध्यक्षातर्फे 30 ऑगस्ट ला औरंगाबाद, 31 ऑगस्टला बीड, केज व त्यानंतर एक सप्टेंबरला धुळ्याचा दौरा करणार आहे. यात नवे पदाधिकाऱ्यांसह मनसेने तयार केलेली व्हिजन सर्वांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. बुधवारी (ता.29) सायंकाळी पाच वाजता औरंगाबादेत दाखल झाले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हॉटेल विटस्‌ येथे शहरातील नामांकित सीए,वकील, उद्योजक असे विविध क्षेत्रातील 200 नामंकित व्यक्‍ती बरोबर "औरंगाबादची ब्यु-प्रिंट' सादर करणार आहे. या विषयी या नामाकिंत व्यक्‍तीची संवाद साधणार आहे. याच कार्यक्रमातून सुचनानाही जाणून घेणार असल्याची माहिती मनसेतर्फे देण्यात आली आहेत. 

राजकीय प्रवेश 
नवनवीन विषयावर आवाज उठविणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच नवीन कार्यकारिणी आणि नियुक्‍त्याचेही कामे या दौऱ्यातून करण्यात येणार आहे. औरंगाबादेतही गुरुवारी सकाळी आकारा वाजता सुभेदारी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.यासह नवीन नियुक्‍त्या देण्यात येणार आहे. नव्या नियुक्‍ती मध्ये शिवसेनेचे माजी महापौर, माजी उपमहापौर, एक विद्यामान अपक्ष नगरसेविका, आणि अन्य पक्षातील लोकांचा प्रवेश होणार आहे. या प्रमुख पक्षातून येणाऱ्यांची नावे गुपीत ठेवण्यात आली आहे. ती पक्ष प्रवेशानंतरच जाहिर केली जाणार असल्याचेही मनसेचा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

राज ठाकरेचे जंगी स्वागत 
राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेचे बुधवारी (ता.29) चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मनसे जिल्हा व शहर कार्यकारिणीतर्फे दुचाकी आणि चारचाकीची स्वागत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, गौतम आमराव, विजय चव्हाण, शहराध्यक्ष सतनामसिंह गुलाटी, उपाध्यक्ष आशिष सुरडकर, गजानन गौड पाटील, अब्दुल रशीद खान, संघटक वैभव मिटकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, महिला आघाडीच्या ऍड. नूतन जैस्वाल, शहराध्यक्ष लिला राजपूत यांच्यासह दोन्ही कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: MNS chief Raj Thackeray present development blue print