लातूरमध्ये 'मनसे'कडून 'ATM'चे श्राध्द

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

लातूर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर महिना उलटला तरी बँका व एटीएम समोरील रांगा संपता संपत नाहीयेत. त्यातच नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून उषाकिरण टॉकीज जवळील आयडीबीआय बँकेच्या एका बंद असलेल्या एटीएम सेंटरचे मंगळवारी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या कार्यकर्त्यांनी चक्क श्राद्ध घातले. 

मोदी सरकारने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय चांगला असला तरी कुठलीही पूर्व तयारी न करता लागू केल्याने शेतकरी, मजूर, कामगार, नोकरदार, व्यापाऱ्यांची पंचाईत झाली. दैनंदिन व्यवहारासाठी देखील हातात पैसे नाहीत. बँकेच्या खात्यात पैसे आहेत, पण एटीएममध्ये खडखडाट, तर बँकांमध्ये शेकडोंच्या रांगा. लातूर शहरात आयडीबीआय बँकेची अनेक एटीएम आहेत. यापैकी उषाकिरण टॉकीज जवळील एटीएम सेंटर महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे बँक प्रशासनाकडून या संदर्भात काहीच सांगितले जात नाही. अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या एटीएम सेंटरवर जाऊन श्राध्दाचा विधी करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. 
 
Web Title: mns performs rituals of atm machine