परभणीत मनसेचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मागील काही दिवसापासून पेट्रोलच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. परभणीत सध्या 86 रुपये दराने पेट्रोलची विक्री होत आहे.

परभणी - पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीत बुधवारी (ता. 23) मोटार सायकलची आत्महत्या असे अनोखे आंदोलन करुन दरवाढीची निषेध केला.

मागील काही दिवसापासून पेट्रोलच्या किमंती भरमसाठ वाढत आहेत. परभणीत सध्या 86 रुपये दराने पेट्रोलची विक्री होत आहे. त्यासोबतच डिझेल 72 रुपये तर गॅस 800 रुपये या दराने विकला जात आहे. या तिन्ही वस्तुंच्या किंमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मनसेने परभणीत आंदोलन केले. शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृवाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MNS protested against petrol hike in Parbhani