ऊसदर प्रश्‍नी मनसेचे ढोल बजाओ आंदोलन

ऊसदर प्रश्‍नी मनसेचे ढोल बजाओ आंदोलन

नांदेड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार दर वाटपास दिरंगाई करणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन, शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे शंभर टक्के पहिला हप्ता वाटप  करावा. या मागणीसाठी मंगळवारी (ता.5) मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसीघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

नांदेड परिक्षेत्रातील कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रिकव्हरी नुसार
 एफआरपी प्रमाणे केवळ 80 टक्के रक्कम पहिल्या हप्त्यात वाटप करीत आहेत. 
उर्वरित वीस टक्के रकमेसाठी शेतकरी कारखानदारांकडे चकरा मारत आहेत. 
परिक्षेत्रातील एकून 24 पैकी 23 कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यंदाच्या
 गळीत हंगामात अद्यापर्यंत 68 लाख 23 हजार 784 मेट्रीक टन उसाच्या
 गाळपातून सरासरीत 11.04  च्या रिकव्हरीनुसार 75 लाख 32 हजार 715 टन
साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या 11.30 च्या रिकव्हरी नुसार
एफआरपी प्रमाणे प्रतिक्विंटसाठी 2 हजार 549.87 रुपये दर निश्‍चिती 
असताना कारखानदरांनी केवळ 1 हजार 800 रुपये पहिला हप्ता उस उत्पादक शेतकऱ्यांना वाटप केला आहे. उर्वरित वीस टक्के रक्कम शेतकऱ्यांशी वैयक्तिक कराराच्या नावाखाली टप्याने दोन टप्यात वाटप करण्याचा कारखानदरांकडून कांगावा
करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार एफआरपी प्रमाणे सरासरीत रिकव्हरीस दर निश्‍चितीस कारखानदरांकडून तिलांजली मिळत असल्याने कारखानदारांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकित आहेत. एफआरपी प्रमाणे दर वाटपास दिरंगाई करणाऱ्या साखर कानखानदरांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार थकित रक्कम तात्काळ वाटप करण्यात 
यावी. यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार
 एकरकमी पहिल्याच हप्त्यात रक्कम वाटप करण्यात यावी आदी मागण्यांसाठी
मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड
प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. 

जिल्ह्यासह परभणी, लातुर, हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह शेतकरी
 आंदोलनमध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्‍वभुमिवर कार्यालयासमोर 
चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यां मनसे सैनिकांनी ढोल
वाजवून परिसर दणानुन सोडला. माजी आमदार जयप्रकश बावसकर, रवी राठौड़, राज अवतानी, शफीक अब्दुल, राजू पाटील बरडे, गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड, शक्ती परमार, पप्पू मनसूके, महेश ठाकूर, गजानन यादव, शिवराज पाटील, गणेश पाटील, प्रविण मंगनाळे, संतोष  बनसोडे, शंकर पाटील, अनिल मुंडकर, शंकर महाजन, अमोल जधाव, गजानन वासमवार, रोहीत कटकमोड, पांडूरंग कोल्हेवाड, उषा नारवाड़े, रानी वाघमारे , रंजना भवरे, प्रेमिला हंमन्ते, उमा सूर्यवंशी, सागर मण्डलपुरे, करुणा 
शेंडेराओ, साहेबराव कोंडावार, व्यंकट वडजे आदी कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित 
होते.

सहसंचालक (साखर) अनुपस्थित:
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने ढोल बजाव आंदोलन नियोजीत असताना  नेहमी प्रमाणे सहसंचालक (साखर) बी. एल. वांगे मंगळवारी मा. न्यायालयीन  कामकाजासाठी औरंगाबाद दौऱ्यावर असल्याने आंदोलनकर्त्यांना चर्चे विना  कार्यालयीन अधिक्षांकडे मागण्यांचे निवेदन द्यावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com