टाकळी कुंभकर्ण येथे ग्रामीण पोलिसांवर जमावाचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

परभणी - चक्काजाम आंदोलनात रस्ता मोकळा करण्यास गेलेल्या परभणी ग्रामीण पोलिसांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह एक फौजदार आठ पोलिस जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धर्मापूरी (ता.परभणी) येथील रस्ता मोकळा करून पुढे टाकळी कुंभकर्ण (ता.परभणी) येथे जाणाऱ्या ग्रामीण पोलिसांच्या गाडीला टाकळी कुंभकर्ण शिवारात मोठ्या जमावाने अडविले. पोलिसांना खाली उतरूवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. जमावाने लाठ्या - काठ्या व दगडाचा वापर करून पोलिसांवर हल्ला केला. यात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांच्यासह फौजदार उदय सावंत, पोलिस कर्मचारी जनार्दन चाटे, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर निंबाळकर, साईनाथ मिठेवाड, सुरेश सुरनर, योगेश सानप हे आठ कर्मचारी - अधिकारी जमावाच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या पैकी योगेश सानप व जनार्दन चाटे यांना जोरदार मारहाण झाली आहे. 

Web Title: A mob attack on rural police at Talwali Kumbhakarna