तो मोबाईल आलाच कसा? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

औरंगाबाद - हर्सूल मध्यवर्ती कारागृहात एक मोबाईल व दोन बॅटरी सापडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी (ता. 13) उघडकीस आल्याने कारागृह प्रशासनाने कारवाईला सुरवात केली. दरम्यान, त्या मोबाईलचा कुणी व कसा वापर केला, याचा तपास सायबर सेल करणार आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरुद्ध शनिवारी (ता. 15) गुन्ह्याची नोंद झाली. 

हर्सूल कारागृहात चक्क मोबाईल फोन व दोन बॅटरी सापडल्याचा प्रकार उघडकीस आला. कारागृहातील सर्कल सोळामध्ये गुरुवारी सायंकाळी पाच ते साडेपाचदरम्यान बेवारस मोबाईल आढळून आला. याबाबत सर्कलमधील एका खबऱ्यानेच माहिती दिली होती. पांढऱ्या रंगाचा सीमकार्ड नसलेला मोबाईल तसेच मोबाईलच्या दोन बॅटरी सापडल्या. कारागृहात मोबाईल नेण्यास व वापरण्यास बंदी असताना चक्क कैदी असलेल्या परिसरातच या बाबी सापडल्याने त्यावरून संपर्क झाल्याची दाट शक्‍यता आहे. या सर्व शक्‍यता सायबर सेल पडताळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सुरक्षाव्यवस्था भेदून बॅटरी, मोबाईल आत गेल्याने कारागृह सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारागृहातील अथवा प्रशासनातील व्यक्तींची याला साथ असण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. या प्रकरणात कारागृहातील अधिकारी चंद्रकिरण तायडे यांनी तक्रार दिली. त्यानुसार हर्सूल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. 

Web Title: mobile and two battery found in Harsul Central Jail