विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी आता "मोबाईल ऍप'

विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी आता "मोबाईल ऍप'

नांदेड - सर्व माध्यमांच्या शासकीय, खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी भरण्यासाठी शिक्षण विभागातर्फे मोबाईल ऍप्स देण्यात आले आहे. "डेली अटेंडन्स ऍप' डाऊनलोड करण्यासाठी "स्टुडंट पोर्टल'वर या आठवड्यात ते उपलब्ध होणार आहे.

या ऍपमध्ये गेल्या दोन जानेवारीपासूनची सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखविणे आवश्‍यक आहे. याबाबत शिक्षकांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोबाईल नेटवर्कनुसार एखाद्यावेळी अडचणी येऊ शकतात, मात्र नंतर ते डाऊनलोड होईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

असे आहे उपस्थिती ऍप
राज्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची हजेरी भरण्यासाठी शासनाने "डेली अटेंडन्स ऍप' दिले आहे. त्यात प्रत्येक तुकडी व इयत्तानुसार विद्यार्थी उपस्थिती भरावयाची आहे. यासाठी प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्ट फोन आवश्‍यक आहे. मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करताना शाळेतून बदली झालेल्या शिक्षकाचे नाव डिलिट करून नवीन शिक्षकाची नोंद करावी. यासाठी https://education.maharashtra.gov.in या "सरल'च्या वेबसाइटवरील मेनूत प्रत्येक शिक्षकाचे नाव, शालार्थ आयडी, पद, कार्यालय, ई-मेल आयडी, संपर्क क्रमांकांची नोंद करून क्‍लिक करावे. प्रत्येक शाळेत वर्ग आणि तुकडी शिक्षक नेमावा लागेल.

असा होईल वापर
स्टुडंट पोर्टलवरून ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यात शाळेचा नोंदणी क्रमांक टाकून रजिस्टर केल्यानंतर लॉगीन करावे. यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरही बदलता येईल. कोणता रजिस्टर मोबाईल नंबर वापरणार, हे Reports HM level - teacher master यामध्ये पाहता येते. App ध्ये udise क्रमांक आणि mobile क्रमांक टाकून register या बटनावर click करून मोबाईलवर एक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो टाकून कन्फर्मवर क्‍लिक करायचे. त्यानंतर VIEW ATTENDANCE REPORT व SUBMIT ATTENDANCE REPORT, अशी दोन ऑप्शन येतील. सबमीट अटेंडन्स रिपोर्टवर क्‍लिक केल्यानंतर समोर इयत्ता, तुकडी आणि तारीख निवडावी. त्यात सर्व विद्यार्थ्यांची यादी येईल. हजर- गैरहजर तपशीलासाठी चौकोनात क्‍लिक करावे लागेल. सर्वांत खाली नारंगी रंगाचे सबमीट अटेंडन्स बटन क्‍लिक केल्यानंतर किती विद्यार्थी हजर आणि गैरहजर आहेत हे कळेल, त्या दिवसाची तारीख येईल. त्यानंतर अटेंडन्स सक्‍सेस झाल्याचा मॅसेज आल्यानंतरच माहिती पूर्ण भरली असल्याचे गृहीत धरले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com