मोबाईल शॉपी फोडून दोन लाखांचा माल लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

वाळूज - पंढरपूर येथील एका मोबाईल शॉपीचे पार्टिशन तोडून चोरट्यांनी मोबाईल फोन व अन्य साहित्य असा दोन लाख रुपये किमतीचा माल लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली.

वाळूज - पंढरपूर येथील एका मोबाईल शॉपीचे पार्टिशन तोडून चोरट्यांनी मोबाईल फोन व अन्य साहित्य असा दोन लाख रुपये किमतीचा माल लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली.

पंढरपूर येथे संतोष बाबासाहेब थोरवे यांची मोबाईल शॉपी आहे. सोमवारी रात्री दुकान बंद करून थोरवे हे वाळूज येथे घरी गेल्यानंतर चेरटे दुकानामागे असलेल्या एका लोखंडी गेटवरून उड्या मारून गच्चीवर गेले. त्यानंतर जिन्यातून खाली उतरून एका गोडाउनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या गोडाउन व दुकानामध्ये लाकडी पार्टिशन आहे. ते तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत दोन लाखांचा माल लंपास केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. चोरीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

सीसीटीव्ही कॅमेरे फोडले  
थोरवे यांनी मोबाईल शॉपीत सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. हे चोरट्यांना माहीत असल्याने त्यांनी दुकानात प्रवेश करताच प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. त्यामुळे चोरट्यांचे चित्रण झाले नसल्याचे मोबाईल शॉपीचालक संतोष थोरवे यांनी सांगितले.

Web Title: Mobile shop breaks up to two lakh worth of goods