सीसीटीव्हीमुळे पकडला संशयित मोबाईल चोर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

औरंगाबाद - एका हॉटेलमध्ये हातोहात मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 16) अटक केली.

भारत सुभाष टाकळे (वय 28, रा. विजयंतनगर, देवळाई परिसर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो एका खासगी वाहनांवर चालक आहे.

गारखेड्यातील चौरंगी हॉटेलच्या काऊंटरवरून त्याने गुरुवारी (ता. 15) मोबाईल चोरला होता. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

कॅमेऱ्यात तरुण चोरी करताना दिसला. यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. वाणी मंगल कार्यालयाशेजारी मोबाईल चोरी करणारा संशयित तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना महागडा मोबाईल सापडला. त्याची कसून चौकशी केली असता, हॉटेलमधून मोबाईल चोरी केल्याची त्याने कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक प्रशांत आवारे, जमादार मच्छिंद्र ससाणे, हवालदार योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, रमेश भालेराव यांनी केली.

Web Title: Mobile suspected thief caught cctv camera