जीआरपीकडून मोबाईल चोरांची टोळी अटक 

फोटो
फोटो

नांदेड : रेल्वे प्रवाशी बेसावध दिसताच त्यांचे किंमती सामान व मोबाईल लंपास करणारी टोळी अटक केली. त्यांच्याकडून ७० हजाराचे पाच मोबाईल जप्त केले आहेत. हे चोरटे लोहमार्ग पोलिसांनी रविवारी (ता. १५) सायंकाळी रेल्वेस्थानक परिसरात केली. 

रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल लंपास करणे, महिलांच्या पर्स पळविणे, वृद्ध प्रवाशांना लुटणे तसेच बेवारस किंमती सामान हातोहात पळविण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या घटनांमुळे लोहमार्ग पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नांदेड, मुदखेड, पूर्णा, भोकर, धर्माबाद, उमरी, परभणी आदी रेल्वेस्थानकावरील अनेक प्रवाशांचे मोबाईल चोरीला गोले होते. 

दिवसाच्या गस्तदरम्यान सापडली टोळी 

या प्रकरणी पोलिस अधीक्षक श्री. कलबुर्गे यांनी आपल्या सर्व अधिनस्त अधिकाऱ्यांना मोबाईल चोरांना पकडून या चोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या सुचना दिल्या. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह हद्दीत गस्त वाढविली. दाखल झालेल्या चोरीच्या व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध सुरू केला. यावेळी रविवारी (ता. १६) गस्त घालत असतांना काहीजण संशयीतरित्या रेल्वेस्थानक परिसरात फिरत असतांना आढळून आले. 

हे आहेत अट्टल मोबाईल चोर

या चारही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून चोरलेले व गुन्ह्यात दाखल असलेले चार मोबाईल जप्त केले. अटक केलेल्यामध्ये शेख इमरान शेख कट्टु, अब्दुल फैसल अब्दुल रौफ, राजू देविदास वाघमारे आणि विजय शामराव वाघमारे यांचा समावेश आहे. शेख इमरानकडून १८ हजार ५०० रुपयाचा सॅमसंग ए- ५० काळया रंगाचा व ओपो -७ हा दहा हजाराचा असा २८ हजार ५०० रुपयाचे दोन मोबाईल जप्त केले. अब्दुल रौफ याच्याकडून विवो  वाय- २१ एल या कंपनीचा सात ५००, तसेच राजू वाघमारे याच्या ताब्यातून विवो वाय- ९१ हा सात हजार ९५० रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला तर विजय वाघमारे याच्याकडूनही विवो कंपनीचा नेव्ही ब्लु रंगाचा २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. 

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

या कारवाईत पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह परिश्रम घेत या चोरट्यांना अटक करुन ७० हजाराचे पाच मोबाईल जप्त केले. या चारही चोट्यांना औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी आपल्या किंमती सामानाची देखभाल व काळजी घ्यावी, तसेच अनोळखी व्यक्तीकडे आपले सामान देऊ नये असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com