मोबाईल चोरटे जेरबंद, पावणे दान लाखाचे 24 मोबाईल जप्त 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 27 जून 2018

नांदेड : शहरात मोबाईल चोरांनी डोके वर काढल्यामुळे अनेकांचे किंमती मोबाईल चोरीला जात होते. बऱ्याच वेळा तर कानाला लावलेला व हातात धरलेला मोबाईल चोरटे दुचाकीवरून हिसकावून घेऊन पळत असत. या टोळीतील चार सदस्य पोलिसांच्या कचाट्यात सापडले. त्यांच्याकडून एक लाख ७८ हजाराचे २४ मोबाईल जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली आहे.

शहरातील आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणी, रेल्वेस्थानक, बसस्थानक, चित्रपटगृह या भागात मोबाईल चोरटे सक्रीय झाले आहेत. बऱ्याच वेळा तर कानाला लावलेला किंवा हातात धरलेला मोबाईल चोरट्यांनी लंपास केला म्हणून समजाच. मोबाईल चोरीच्या घटनात कमालीची वाढ झाल्याने पोलिसांची झोप उडाली होती. दुचाकीस्वार हे चोरटे मोबाईल चोरी झाल्यानंतर काही दिवस शांत बसायचे. त्यानंतर पुन्हा या घटना घडवित असत.

पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांना सुचना दिल्या. यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वंभर पल्लेवाड यांना आदेशीत केले. त्यांनी माणिक हंबर्डे, महेश कुलकुर्णी, माधव केंद्रे, संजय पांढरे, ब्रम्हानंद लामतुरे, मोतीराम पवार, बजरंग बोडके, समीर अहेमद आणि सोनाजी कानगुले यांना सोबत घेऊन शहरातील मोबाईल चोरांवर पाळत ठेवली. यावेळी त्यांनी शेख सलीम शेख अब्दुल रज्जाक (वय १८) फारूखनगर, गणेश उर्फ गण्या गौत्तम घाते (वय १८), नितीन बाबुराव हंबर्डे (वय २२) रा. अमराबाद ता. अर्धापूर आणि एका अल्पवयीन चोरट्यास अटक केले. त्यांच्याकडून २४ किंमती मोबाईल ( एक लाख ७८ हजार) जप्त केले. या चोरट्यांकडून अजून मोबाईल जप्त होण्याची शक्यता सहाने यांनी व्यक्त केली. 

Web Title: mobile thieves arrested 24 mobiles are seized