मोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

लातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला माफ करणार नाहीत. मी सरकारच्या नव्हे, तर जनतेच्या बाजूने आहे. जनतेचे प्रश्न मांडत आहे. सरकार चुकत असेल तर आसूड ओढणारच. आम्ही राजकारण करीत नाही. जनतेच्या मदतीला धावून जातो. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. केंद्रातील मोदी सरकार हे भंपक असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. येथे आज झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

गेल्या निवडणुकीत खोटे बोलून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. प्रचारासाठी मोदींनी विक्रमी सभा घेतल्या. महाराष्ट्रात दुष्काळ असताना पंतप्रधान कुठे आहेत? दुष्काळ पाहणीसाठी केंद्राचे पथक येणार, समिती नेमणार, अहवाल घेणार, असे सांगितले जात आहे. नोटाबंदीच्या वेळी समिती नेमली होती का, असा सवाल त्यांनी केला. आपण २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

पंचांग पाहून दुष्काळ जाहीर करणार का?
राज्यात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. मुख्यमंत्री पंचांग पाहून दुष्काळ जाहीर करणार आहेत काय? पंचांग पाहून काम करणारे सरकार काय कामाचे? मुख्यमंत्र्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही का? उपग्रहाद्वारे मॅपिंगनंतर दुष्काळ जाहीर करणार, असे ते सांगत आहेत. मग तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कशाला बसला आहात? उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका, असा उपरोधिक टोलाही ठाकरे यांनी लगावला.

Web Title: Modi government Bhampak says uddhav thackeray