esakal | 'आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचा डाव'
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

'आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचा डाव'

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : मागास व अविकसित जातीतील बांधवांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या Congress Party सरकारने आरक्षणाच्या माध्यमाद्वारे काम केले. याउलट मोदी सरकार Modi Government देशातील आरक्षण व्यवस्था संपविण्याचा डाव आखत असून हा प्रकार देश कधीही सहन करुन घेणार नाही. त्यामुळेच येत्या काळात केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे ओबीसी कार्यकर्ते धरणे आंदोलन करुन जबाब विचारला जाईल, असे काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सांगितले. येथील Hingoli जिल्हा काँग्रेस कार्यालयात आज मंगळवारी (ता.सहा) ओबीसी विभागाच्या Obc Reservation कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रदांजली अर्पण करण्यात आली.modi government planning to be close reservation policy hingoli news

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

श्री.माळी म्हणाले, की केंद्रातील भाजप सरकारची भूमिका खोटे बोल, पण रेटून बोल, अशी आहे. त्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार आहोत. या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणार आहे.यावेळी माजी आमदार डॉ,संतोष टारफे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, भगवान कोलेकर, संतोष रसाळकर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप देसाई, बाबा नाईक, तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख, बापुराव बांगर, शामराव जगताप, नगरपरिषदेचे गटनेते शेख नेहाल, सतीश पाचपुते, भगवान खंदारे, रमेश जाधव, अनिल नेनवाणी, विलास गोरे, ओम देशमुख, मधुकर जामठीकर, राजेश भोसले, शिवाजी मस्के, भास्कर पोले, विशाल घुगे, जुबेर मामु, बंटी नागरे, श्रीराम जाधव, नामदेव नागरे यांच्या काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

loading image