मोदी सरकार हल्ले घडवून आणेल : पृथ्वीराज चव्हाण

chavhan
chavhan

लातूर : केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर जनतेच्या समोर जाऊच शकत नाही. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी मंदिराचा मुद्दा, आमच्या आघाडीत फूट कशी पाडली जाईल याचा प्रयत्न करेल इतकेच नव्हे तर समाजात हल्ले घडवून आणेल, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे गुरुवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत केला.

`राफेल`मधील भ्रष्टाचाराचे वातावरण तापू लागल्याने सीबीआयचे नाट्य घडवून आणण्यात आले आहे. सीबीआयचे संचालक व विशेष संचालकात सुरु असलेला प्रकारात मोदींनी कायद्याला मोडून हस्तक्षेप केला. त्यांना कशाची भिती वाटत आहे.राफेलमधील भ्रष्टाचार हा निवडणूकीचा मुद्दा असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदींच्या काळात पहिल्यांदा कृषी अर्थव्यवस्थेचा विकास दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मोदींची मानसिकता ही व्यापाऱयाची आहे. त्यामुळे ते ग्राहकांचे हित लक्षात घेत आहेत. देशातील शेतकऱयांना मात्र वाऱय़ावर सोडले जात आहे. केंद्र सरकार सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक वर्षात 18 टक्केने रुपया घसरला आहे. पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून केंद्र सरकारने कराच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशातील २१ लाख कोटी रुपये काढले आहेत. देशासमोर गंभीर आर्थिक संकट आहे. येत्या निवडणुकीत ते जाहिरनामा काढण्याची हिंमत करणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.
आघाडी, महाआघाडी होईल. तसे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान कोण होणार हा आमच्या समोर प्रश्न नाही. मोदी सरकारला पाडणे हे आमचे उद्दीष्ट आहे. विरोधकांच्या जागा जास्त आल्यानंतर सर्व बसून पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकार विकासाचा अजेंडा घेवून जनतेसमोर येणार नाही. केवळ भूलथापा देण्याचेच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आमची आघाडी कशी होणार नाही, त्यात फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मंदिराचा मुद्दा पुन्हा समोर आणतील. इतकेच नव्हे तर हल्ले घडवून आणतील असा आरोपही श्री. चव्हाण यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख, मोईज शेख, एस. आर. देशमुख, दीपक सूळ उपस्थित होते.

दक्षिण कराडमधूनच लढणार
पुणे, सांगली येथून मी लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा केली जात आहे. त्या केवळ अफवा आहेत. मी दक्षिण कराडमधूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com