मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत : डॉ. कुमार सप्तर्षी

सुशांत सांगवे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

लातूर : नवे रस्ते तयार करणे, यापलिकडे देशात कुठलीही विकासाची कामे सुरू नाहीत. तर दुसरीकडे, समाजातील वातावरण बिघडवले जात आहे. एकमेकांत द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे मोदी पून्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी बुधवारी व्यक्त केले. मराठा आरक्षण ही निव्वळ दिशाभूल आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही राजकीय खेळी आहे. हा अहवाल न्यायालयात टिकणे फार अवघड आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

एका कार्यक्रमानिमित्ताने डॉ. सप्तर्षी लातूरात आले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ समाजवादी नेते मनोहर गोमारे, साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. सोमनाथ रोडे, ‘अंनिस’चे सचिव माधव बावगे, शहराध्यक्ष वैजनाथ कोरे, लेखिका सुनीता अरळीकर याप्रसंगी उपस्थित होत्या.

मोदी प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी एका मुस्लिम तरुणाचा बळी घेतला. त्या घटनेपासून मी मोदींचा कट्टर विरोधक बनलो, असे सांगून डॉ. सप्तर्षी म्हणाले, सध्याच्या राजकारणासमोर एकच प्रश्न आहे, भाजपाला पून्हा एकहाती विजय मिळणार का? म्हणून तर महाआघाडीचा प्रयत्न सुरू आहे. तो भाजपला एकहाती सत्ता मिळू नये यासाठी आहे. पण दुसरीकडे, मोदी आणि शहा ही जोडी निवडणूकीच्या तोंडावर कोणकोणते पावले उचलणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. कारण ते काहीही करू शकतात, हा त्यांचा इतिहास आहे.

मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा आहे. अतिशय शांततेत मुक मोर्चे निघाले. त्यातून एक वेगळाच आदर्श निर्माण झाला. त्यांच्या मागणीनूसार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने ऐन निवडणूकीच्या तोंडावर घेतला आहे. पण याबाबतचा अहवाल न्यायालयात टिकणे फारच अवघड आहे. सरकारने आशा खूप दाखवली आहे. त्यामुळे दुसरीकडे निराशासुद्धा जोरदार पसरली आहे, त्याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. या अहवालावर न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूका होऊन जातील. त्यामुळे हा संपूर्ण राजकीय डावपेच आहे, तो आपण ओळखला पाहीजे. आरक्षणासारख्या संवेदशील विषयाबाबत असे डावपेच असता कामा नये, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.

‘‘मराठा आरक्षणाच्या निर्णयातून राज्य सरकारने मराठा समाजाला ‘आम्हीच तुमचे कैवारी आहोत’, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर सत्ताप्राप्तीसाठी एक मोठा समूह आपल्या पाठीशी राहावा म्हणून केलेला हा राजकीय डावपेच आहे. ही धुळफेकच आहे. अशी धुळफेक सरकारने कोणासोबतही करू नये.’’
- डॉ. कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: modi will never will prime Minister said kumar saptarshi