पाठलाग करून 16 वर्षीय युवतीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

- पाठलाग करून युवतीचा विनयभंग 

- शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड : एका अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या एकावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळची उत्तरप्रदेशमध्ये राहणारी 16 वर्षीय युवती आपल्या परिवारासह शहराच्या वसरणी भागात राहते. ती गोकूळनगर भागात कामासाठी ये-जा करीत असल्याचा फायदा गोकूळनगर भागात राहणारा सोनु उर्फ अतुल कांबळे याने तिचा पाठलाग करणे सुरू केले. रविवारी (ता. 16) दुपारी पिडीत युवती ही घराकडे जात असतांना गोकुळनगर भागातील महालक्ष्मी आॅईल शोरुमसमोर तिचा हात धरून मला तु का बोलत नाहीस, मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू असे म्हणून तिचा विनयभंग केला.

मात्र, पिडीत युवतीने त्याला नकार देताच तिला मारहाण करून शिवीगाळ केली. हा प्रकार पिडीतेनी आपल्या पालकांना सांगितला. तिला सोबत घेऊन पालकांनी शिवाजीनगर ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरुन सोनु कांबळेविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भोपाळे ह्या करीत आहेत.

Web Title: The molestation of the girl In Nanded District