नांदेडमध्ये तृतीयपंथीयावर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 24 एप्रिल 2019

तृतीयपंथियांसोबत लगट करून त्याला विश्वासात घेऊन सात लाख रुपये उकळले. एवढेच नाही तर मागील एक वर्षापासून त्याच्यावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या एकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 22) विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. 

नांदेड : तृतीयपंथियांसोबत लगट करून त्याला विश्वासात घेऊन सात लाख रुपये उकळले. एवढेच नाही तर मागील एक वर्षापासून त्याच्यावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या एकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 22) विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. 

शहराच्या नई आबादी परिसरात राहणारा फैसल मोईज सिद्दीकी याने एका तृतीयपंथियाशी ओळख पाडली. यातून ते घनीष्ठ मित्र झाले. जन्मभर सुखात ठेवीन असे आमिष फैसल याने तृतीयपंथीयाला दाखविले. त्याच्याकडून व्यापार करण्यासाठी रोख सात लाख रुपये उकळले. मागील एक वर्षापासून त्याच्याशी तो अनैसर्गीक अत्याचार करीत होता.

अखेर दिलेले सात लाख रुपये परत करीत नसल्याने तृतीयपंथियावर उपासमारीची वेळ आली. शेवटी त्याने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून अनैसर्गीक अत्याचार, फसवणुक, विश्वासघात यासह आदी कलमान्वये फैसल मोईजविरूध्द गुन्हा दाखल केला. तपास फौजदार श्री. होळकर हे करीत आहेत.

Web Title: molestation of transgender in Nanded