औरंगाबादेत धनगर आरक्षणासाठी सोमवारी आंदोलन 

संदीप लांडगे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाजाला अनुसूचित आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी सकल या संदर्भात जिल्हाधिकारी यांना एक निवेदनही देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की सत्तेत येण्यापूर्वी व सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

औरंगाबाद- 'यळकोट यळकोट जय मल्हार' चा जयघोष करत तसेच पारंपारिक वाघ्या- मुरळीच्या वेश परिधान करुन जागरण गोंधळ घालत, 
धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता. 13) चिकलठाणा येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

धनगर समाजाला अनुसूचित आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी सकल या संदर्भात जिल्हाधिकारी यांना एक निवेदनही देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की सत्तेत येण्यापूर्वी व सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आजपर्यंत धनगर समाजाला राज्य शासनाने अनुसूचित जमाती आरक्षण दिले नाही; जर 30 ऑगस्टपर्यंत आरक्षणासंदर्भात निर्णय न घेतल्यास सकल धनगर समाजाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलन तीव्र करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी शासनाची असेल. असे आयोजकांनी सांगितले. 
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: On Monday Agitation in Aurangabad For Dhanagar Reservation