अंबडला पिशवीतून पडले नोटांचे बंडल

अंबड : पिशवीतील पाच लाख सत्तर हजार रुपायांच्या रकमेसह सहायक पोलिस निरीक्षक कसबे, प्रकाश नारायणकर आदी.
अंबड : पिशवीतील पाच लाख सत्तर हजार रुपायांच्या रकमेसह सहायक पोलिस निरीक्षक कसबे, प्रकाश नारायणकर आदी.

अंबड  (जि.जालना) -  येथील रजिस्ट्री कार्यालयात गुरुवारी (ता.12) कामानिमित्त गेलेल्या माजी नगरसेवक प्रकाशन नारायणकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत यांना सहायक निबंधक संजय काळे यांच्या कारजवळ पिशवीतून पडलेले नोटांचे बंडल आढळले. याबाबत विचारणा केली असता, काळे यांनी रकमेसह पिशवीबाबतही हात झटकले. त्यामुळे पिशवीतील पाच लाख रुपयांची रक्‍कम अंबड पोलिस ठाण्यात सुपूर्द करून याबाबत चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. 

शहरातील माजी नगरसेवक प्रकाश नारायणकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, बाळासाहेब तायडे, शेख रफिक हे त्यांच्या खासगी कामानिमित्त गुरुवारी (ता. 12) दुपारी सव्वादोन वाजेच्या दरम्यान पाचोड रोडलगत असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात गेले होते. यावेळी जवळच सहायक निबंधक संजय सोनाजी काळे यांची कार उभी होती. तेव्हा कारजवळ पिशवीतील एक पैशाचे बंडल खाली पडले होते. त्यावेळी बाजूलाच उभा असलेले प्रकाश नारायणकर व अन्यजणांना ही बाब दिसली. विचारणा केली असता श्री. काळे यांनी पिशवीतील पैशांबाबत हात झटकले, शिवाय ते तेथून निघून गेले. त्यामुळे श्री. नारायणकर यांनी पिशवी व त्यातील रोख 
रक्कम घेऊन तातडीने तालुका पोलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस निरीक्षक कसबे यांच्याकडे पिशवी स्वाधीन केली. 

पोलिसांनी पंचांसमक्ष पिशवीतील पैसे मोजले असता त्यामध्ये शंभर रुपये तसेच पाचशे रुपयांचे नोटांचे बंडल असे एकूण पाच लाख सत्तर हजार रुपये निघाले. माजी नगरसेवक प्रकाश नारायणकर यांनी अंबड पोलिस ठाण्यात लेखी अर्ज देऊन याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
दरम्यान, सहायक निबंधक संजय काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही रक्‍कम आपली नसल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com