सावकारी पाश, सत्यानाश...

भास्कर बलखंडे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जालना - राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये चकरा मारूनही अनेक शेतकरी, गरजवंतांना कर्ज मिळत नाही, परिणामी खासगी सावकारांची मात्र चांदी होत आहे. सावकारी पाशात एकदा सापडले की वसुलीला सुमार राहत नसल्याचे विदारक चित्र आहे. खासगी कर्जावर अवाच्या सव्वा वसुली केली जात आहे. अनेकांना गहाण शेतजमिनी, मालमत्ता गमवाव्या लागत असल्याचेही भयंकर वास्तव आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून प्रतिसाद मिळत नसला, की शेतकरी वा मजूरदार खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन आपली गरज भागवतात. जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षात परवानाधारक ११८ खासगी सावकारांनी १३ हजार नऊ जणांना एक कोटी १९ लाख ५६ हजार रुपयांचे बिगरकृषी कर्ज वाटप केले. 

तसेच एक लाख ३० हजार कृषी असे एकूण एक कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आजही सावकारी पाशात अडकला असल्याचे स्पष्ट होत आहे. घेतलेल्या कर्जाच्या व्याजाबाबतही बहुतांश वेळा शेतकऱ्यांना माहिती नसते, परिणामी मनमानी पद्धतीने व्याज आकारले जाते, शिवाय कर्जाच्या वसुलीसाठी अनेकदा बळाचा वापर केला जातोय.

Web Title: Money Lender Loan Interest

टॅग्स