सावकार महिलेला सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

औरंगाबाद - गरजेसाठी घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतही तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बळकाविणाऱ्या सावकार महिलेस न्यायालयाने तीन वर्षे सक्‍तमजुरी आणि नुकसानभरपाई म्हणून दोन लाख तक्रारदारास देण्याचा आदेश दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी हा निकाल दिला.

मोहम्मद खाजा ऊर्फ युसूफभाई मोहम्मद हुसेन (रा. अबरार कॉलनी, बीड बायपास परिसर) यांनी पैशांची गरज असल्याने सावकार महिला बानोबी नईम खान पठाण (रा. आमेरनगर) हिच्याकडून 17 डिसेंबर 2009 रोजी चाळीस हजार रुपये पाच टक्के व्याजदाराने घेतले होते. त्यासाठी तारण म्हणून सहा तोळे सोन्याचे दागिने, तर काही चांदीचे दागिने दिले होते. त्यांनी नऊ महिन्यांनंतर मूळ रक्‍कम व्याजासह परत दिली. तारण ठेवलेल्या दागिन्यांची मागणी बानोबीकडे केली असता तिने दागिने परत दिले नाहीत. खोटी केस दाखल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे मोहम्मद खाजा यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: money lender women punishment