औरंगाबादेत श्रावणाची पहिली सर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

गेल्या वीस पंचवीस दिवसात शहरात म्हणावा तसा पाऊस झालेला नव्हता. शहराच्या कोणत्या तरी भागात काही थेंब पडणे हाच काय तो झालेला पाऊस. मध्यम स्वरूपाचा पाऊस हा गेल्या महिनाभरात दुर्मिळ झाला होता.

औरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने औरंगाबाद शहराला दिलेली ओढ गुरुवारी (ता. १६) संपली. सकाळपासूनच पावसाने शहरात झड लागली असून सकाळी साडेआठपर्यंत ३.५ मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा हवामान केंद्रात झाली. 

गेल्या वीस पंचवीस दिवसात शहरात म्हणावा तसा पाऊस झालेला नव्हता. शहराच्या कोणत्या तरी भागात काही थेंब पडणे हाच काय तो झालेला पाऊस. मध्यम स्वरूपाचा पाऊस हा गेल्या महिनाभरात दुर्मिळ झाला होता. गुरुवारी मात्र सकाळी पावसाने सुखद धक्का देत शहराला भिजवून काढले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवढ्याभरात शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: monsoon rain in Aurangabad