दीड महिन्यानंतर जालन्यात पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मागील दीड महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिवली होती. त्यामुळे खरीप पीके धोक्यात आलेत. मात्र गुरुवारी (ता.16) पहाटेपासून जालना शहर आणि परिसरासह भोकरदन, अंबड, घनसावंगी, बदनापुर, मंठा, परतुर, जाफराबाद तालुक्यात सर्वदूर पावसाने रिमझीम हजेरी लावली आहे.

जालना : मागील दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यात रिमझीम हजेरी लावली आहे.

मागील दीड महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिवली होती. त्यामुळे खरीप पीके धोक्यात आलेत. मात्र गुरुवारी (ता.16) पहाटेपासून जालना शहर आणि परिसरासह भोकरदन, अंबड, घनसावंगी, बदनापुर, मंठा, परतुर, जाफराबाद तालुक्यात सर्वदूर पावसाने रिमझीम हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप पिकांना आधार मिळाला असून पीके तरतील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझीम पाऊस सुरु आहे.

Web Title: Monsoon rain in Jalna

टॅग्स