एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात पाऊस

हरी तुगावकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

लातूरसह, निलंगा, चाकूर, चापोली, औरादशहाजनी, औसा, हाळी हंडरगुळी, देवणी, जळकोट आदी भागात हा पाऊस झाला आहे.

लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी (ता. १६) रात्री जिल्ह्यात हजेरी लावली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्री पाऊस झाला आहे. शहरातही रात्री तसेच सकाळी सातच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे वाळत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्हयातील खरीप पिक धोक्यात आले होते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. तेथीलच पिक तग धरून होती. पण जिल्ह्यातील बुहतांश पिकांना मात्र पाऊस नसल्याने फटका बसत होता. जिल्ह्यातील शेतकऱय़ांच्या आभाळाकडेच नजरा
होत्या. त्यात गुरुवारी रात्री पावसाला सुरवात झाली.  

लातूरसह, निलंगा, चाकूर, चापोली, औरादशहाजनी, औसा, हाळी हंडरगुळी, देवणी, जळकोट आदी भागात हा पाऊस झाला आहे.

Web Title: monsoon rain in Latur