मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना जीवनदान

सुषेन जाधव
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

सेलू, मंठ्यात भिज पाऊस
परभणी जिल्ह्यातील सेलू, आणि मंठा, परतूर (जि. जालना या ठिकाणी बुधवारी रात्रीपासून भिज पावसाला सुरवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील कपाशी पिकासह तूर, मूग, बाजरी पिकाला मोठा फटका बसला. मात्र मराठवाड्यातील सोयगाव, कन्नड, गंगापूर तालुका, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, लातुर आदी ठिकाणी बुधवारी रात्रीपासून रिपरिप पावसाची सुरवात झाली.

सिल्लोड आणि खुलताबाद, भोकरदन (जि. जालना) तालुक्यात हलका पाऊस झाला. तसेच गुरुवारी सकाळी यात वाढ झाल्याने मराठवाड्यातील कपाशीला पावसाचा चांगलाच आधार झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २० दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरवात झाली. शहरातही सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याने शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

सेलू, मंठ्यात भिज पाऊस
परभणी जिल्ह्यातील सेलू, आणि मंठा, परतूर (जि. जालना या ठिकाणी बुधवारी रात्रीपासून भिज पावसाला सुरवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

उत्तर भारतात केंद्रित असलेला मान्सून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणावर केंद्रित होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाड्यासाठी हा पहिला दमदार पाऊस असणार आहे. 
- उदय देवळाणकर, कृषी अभ्यासक

Web Title: monsoon rain in Marathwada