श्रावण सरींनी तारला खरीप हंगाम; परभणीत संततधार

कैलास चव्हाण
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

जिंतूर, सेलू,मानवत भागात ही चांगला पाऊस सुरू झाला आहे.या पावसामुळे पूर्णा, गोदावरी, दुधना नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. दरम्यान परभणी शहरात सकाळी नऊ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

परभणी : तब्बल सव्वा महिन्याच्या विश्रांती नंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. बुधवार (ता.15) रात्री नऊ वाजल्यापासून पाऊस पडत आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरिप हंगामातील पिके धोक्यात आली होती. केवळ ढगाळ वातावरणामुळे पिके जीवंत राहीली होती.जुले महिन्यातील तीन आठवडे आणि ऑगस्ट महिन्यातील सुरवातीचे 15 दिवस कोरडे गेल्यानंतर बुधवार पावसाचे आगमन झाले आहे.रात्री हलक्या स्वरूपात असलेल्या पावसाने गुरुवारी पहाटेपासून चांगलाच जोर धरला आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे.

जिंतूर, सेलू,मानवत भागात ही चांगला पाऊस सुरू झाला आहे.या पावसामुळे पूर्णा, गोदावरी, दुधना नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. दरम्यान परभणी शहरात सकाळी नऊ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

Web Title: monsoon rain in Parbhani