शाळाबंद विरोधात परभणीत मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

​पूर्वाश्रमीचे शिक्षक तथा विद्यमान प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्यांनी खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. परंतु अत्यंत सर्वसामान्य घरची मुले या शाळेत शिक्षण घेतात. त्यांचे भवितव्य अंधकारमय होऊ नये म्हणून हा मोर्चा काढण्यात आला.

परभणी- 1944 सालची स्थापना असलेली ऐतिहासिक जिल्हा परिषद बहूविध प्रशाला बंद करू नये, या मागणीसाठी सोमवारी (ता.27) परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. लोकाश्रय मित्रमंडळाच्या या मोर्चात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

पूर्वाश्रमीचे शिक्षक तथा विद्यमान प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्यांनी खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. परंतु अत्यंत सर्वसामान्य घरची मुले या शाळेत शिक्षण घेतात. त्यांचे भवितव्य अंधकारमय होऊ नये म्हणून हा मोर्चा काढण्यात आला.

लोकाश्रय मित्रमंडळ अध्यक्ष सलीम इनामदार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नसरीम बेगम मौनोद्यीन, सय्यद फारूखी यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: Morcha against school close in parbhani