नववर्षात पोलिसांसमोर आव्हानांचा "हिमालय' 

police
police

औरंगाबाद : गेल्या वर्षीच्या रक्तरंजीत घटना, त्यासंबंधी केलेल्या कायदा व सुव्यस्थेतील चुकांतून बोध घेत नवीन वर्षात पोलिस दलाला शहरात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. एकीकडे पोलिसांसमोर समस्यांचा डोंगर असला तरी आव्हानांचा "हिमालय'ही त्यांना सर करून लोकसभा, विधानसभा निवडणुकांत अधिक सजगताही बाळगावी लागणार आहे. 

पोलिस दलाने 2018 चा वार्षिक आढावा घेतला. त्यात गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही. वर्षाच्या अखेरीस चोरांनी जोरदार "बॅटिंग' करून लग्न, समारंभांतून तब्बल 75 तोळे दागिने लंपास केले. सात घटनांपैकी एकाही घटनेची पोलिस अद्याप उकल करू शकले नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात चोरांचे मोठे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. सोबतच पारदर्शक कारभारावर लक्ष द्यावे लागेल. पोलिस ठाण्यात आलेल्या फिर्यादींना पोलिसांकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा असते. याकडेही लक्ष द्यावे लागेल. यासोबतच पोलिस वसाहती, तेथील डागडुजीचा प्रश्‍न कायम आहे. पोलिसांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा अधिक उत्तम व्हावा, यासाठीही प्रयत्न करावे लागतील. 

नववर्षातील आव्हाने... 
-दंगलीचा काळाकुट्ट डाग पुसावा लागेल. 
-दंगली घडूच नयेत यासाठी ठोस उपाय योजावे लागतील. 
-वर्ष 2018 व पूर्वीच्या घटनांचे तपास पूर्णत्वास न्यावे लागतील. 
-निवडणूक काळात हिंसाचार होऊ नये म्हणून उपाय करावे लागतील. 
-नागरिकांचा विश्‍वास जिंकावा लागेल. 
-घरफोडीवर अंकुश ठेवण्यात पोलिस दलाला ठोस उपाय योजावा लागेल. 
-दुचाकी चोरीच्या घटनांवर रोख लावावी लागेल. 
-दुचाकी चोरीसह अन्य गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ठोस उपाय करावे लागतील. 
-वॉंटेड गुन्हेगारांचा शोध घेऊन जास्तीत जास्त कारवाया अपेक्षित. 
-धाक-दडपशाही करणाऱ्यांवर जरब बसवावा लागेल. 
-जमीन घोटाळे निकाली काढीत त्यावर ठोस कारवाया कराव्या लागतील. 
-दंगल नियंत्रण पथके स्थापण्यात आली; पण सरावाची तयारी करावी लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com