राज्यात यंदा विजेचा विक्रमी वापर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

औरंगाबाद - लाही लाही करून सोडणाऱ्या तापमानाने राज्यातील जनता हैराण झाली. त्यामुळे एप्रिलमध्ये विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ झाली असून, राज्यात (मुंबई वगळता) 19 हजार 300 मेगावॉट एवढ्या विजेची मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1300 मेगावॉटने ही मागणी वाढली आहे, अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिली. 

राज्याला दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये 18 हजार मेगावॉट वीज लागते. मात्र, यावर्षी मार्चपासूनच तापमान 40 च्या पुढे गेल्याने मागणी झपाट्याने वाढली. फेब्रुवारीमध्ये 18 हजार 500 मेगावॉटची मागणी होती. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ती 19 हजार 300 पर्यंत पोचली. 

उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी एसी, कूलर, पंखा, फ्रीज यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यंदा तो फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. त्यामुळेच विजेची एवढ्या मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. उन्हाळा अजून दीड महिना असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

वर्षभरात दीड हजार मेगावॉटची वाढ 
एका वर्षभरात जवळपास दीड हजार मेगावॉटने विजेची मागणी वाढली. सध्याची विजेची मागणी आतापर्यंतच्या विजेच्या मागणीचा उच्चांक आहे, असेही संजीव कुमार यांनी सांगितले. 

आठ लाख ग्राहकांची भर 
महावितरणच्या ग्राहकांमध्ये यंदा आठ लाखांची भर पडली. गेल्या वर्षी जानेवारी 2016 मध्ये विजेची सरासरी मागणी 16 हजार 220 मेगावॉट होती. म्हणजे या वर्षभरात एक हजार 960 मेगावॉटने विजेची मागणी वाढली आहे. नव्याने वाढलेले ग्राहक आणि तापमानवाढीमुळे ही मागणी वाढली आहे. 

Web Title: More electricity use