सुपारी किलर इम्रान मेहंदी न्यायालयात हजर

सुषेन जाधव
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्यासह चार जणांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुपारी किलर इम्रान मेहंदी याच्यासह त्याच्या टोळीतील पाच ते सहा जणांना सोमवारी (ता.27) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुपारी किलर मेहंदीसह त्याच्या टोळीतील 10 जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

हे सर्व आरोपी मागील चार वर्षापासून औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात आहेत. या प्रकरणावर आज चार वाजता सुनावणी होणार असून सुपारी किलर मेहंदीसह त्याच्या टोळीतील किती जणांवर कारवाई होते आहे याकडे लक्ष लागले आहे. जानेवारी 2018 मध्ये मेहंदी सह त्याच्या टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले असता माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थक आणि इमरान मेहंदी गटात न्यायालयाच्या आवारातच मारहाण व दगडफेक झाली होती. या अनुषंगाने आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: most wanted criminal Imram mehandi Appear in court