नदीपात्रात उडी घेतल्याने मायलेकींचा मृत्यू

नदीपात्रात उडी घेतल्याने मायलेकींचा मृत्यू

हिंगोली - कनेरगावनाका (जि.हिंगोली) येथील पैनगंगेच्या पात्रामधे पाण्यात बुडून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे. यामधे एका व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे. हे तिघेही सवना (ता. सेनगाव) येथिल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सेनगाव तालुक्यातील सवना येथील विठ्ठलराव नाईक (वय 55) त्यांची पत्नी शकुंतला विठ्ठलराव नाईक (वय 50) व त्यांची मुलगी उमा विठ्ठलराव नाईक (वय 24) यांनी आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कनेरगावनाका येथील जून्या पुलावरून पैनगंगेच्या पात्रात उडी घेतली. सदर प्रकार काही व्यक्तींनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने नदीमधे उड्या घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामधे नाईक यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र यामधे शकुंतला नाईक, उमा नाईक यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

काही वेळानंतर दोघींचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच कनेरगावनाका सह परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक माधव कोरंटलू यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कौटूंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सदर घटना वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमधे येत असल्याचे हिंगोली पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com