औरंगाबाद - भृगू लेक शिखर सर करणारे यशस्वी गिर्यारोहक.
औरंगाबाद - भृगू लेक शिखर सर करणारे यशस्वी गिर्यारोहक.

गिर्यारोहकांनी केले भृगू लेक शिखर सर

औरंगाबाद - शहरातील काव्या स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यातील पर्वतरांगेतील १४ हजार १०७ फूट उंचीवरील भृगू लेक शिखर गिर्यारोहण मोहीम राज्यातील १० गिर्यारोहकांनी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण केली.

कमांडर विनोद नरवडे, एव्हरेस्टवीर रफिक शेख व प्रांतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गिर्यारोहकांनी शिखर पादाक्रांत केले. महाराष्ट्रातील १८ गिर्यारोहक या मोहिमेसाठी मनाली येथे पोचले होते. ९८०० फूट उंचीवर असलेल्या मोरी दुघ बेस कॅम्पला पोचल्यावर टीमने वातावरणाशी जुळवून घेतले. तेथून नंतर कॅम्प २ पांडुरोपा (११००० फूट) येथे ४ तास अथक प्रयत्नांनी टीम पोचली. गाईड कीर्ती व लालसिंग त्यांच्यासोबत होते. यात १८ पैकी १० गिर्यारोहकांनी भृगू लेक सर करीत आपला झेंडा फडकावीत आनंद साजरा केला. हे शिखर इतक्‍या मोठ्या संख्येने सर करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे गाईड कीर्ती यांनी आवर्जून सांगितले. संघटनेच्या अध्यक्षा ज्योती थोरात, वसंतराव धवसे, प्रकाश थोरात यांनी गिर्यारोहकांचे अभिनंदन केले.

मोहिमेत संदीप आवारे, नितीन दराडे, सोलोमन सोनवणे, कमलेश सुरवाडे, विनय सोनवणे, रणवीरसिंग देवरे, संतोष खरे, संदीप आव्हाड, रमेश केदारे, वाल्मीक बागूल, आर्यन आदाणे, छत्रपती खरोटे, शैलेश राकटे, राजेश निकुंभ, सचिन धवसे, नितीन धवसे, राहुल दुधवडे, राजेंद्र सोनवणे इत्यादी सहभागी होते.

जोरात वाहणारे थंड वारे, भरपूर बर्फवृष्टी, ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असल्याने आव्हान निश्‍चितच मोठे होते. त्यातच आठ गिर्यारोहकांनी अंतिम क्षणाला माघार घेतली. आम्ही मात्र जिद्द सोडली नाही. एकमेकांना मदत करीत मोहीम फत्ते केली. रमेश केदारे व संतोष खरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
- सचिन धवसे, नितीन धवसे, गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com