संविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत केलेल्या सद्भावना दिवसानिमित्त पोलिस अधिक्षक संजय जाधव बोलत होते.

नांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत केलेल्या सद्भावना दिवसानिमित्त पोलिस अधिक्षक संजय जाधव बोलत होते.

यावेळी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, पोलिस उपाधिक्षक (मुख्यालय) ए. जी. खान यांची उपस्थिती होती. पुढे बाेलतांना जाधव म्हणाले की, जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा असा भेद न करता सर्व भारतीयांनी संविधानाच्या मार्गाचा अवलंब करून आपली वाटचाल करावी.

एकमेकातील सामंजस्य आणि भावनिक एेक्य मजबुत करून आपसातील मतभेद विसरून सलोख्याने नांदले पाहिजे. असे आवाहन जाधव यांनी केले. यावेळी ए. जी. खान यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना सद्भावनादिवसाची शपथ दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने, जिल्हा विशेष शाखेचे प्रशांत देशपांडे, नियंत्रण कक्षाचे सुनील निकाळजे, जनसंपर्क अधिकारी अशोक लाटकर यांच्यासह पोलिस अधिक्षक कार्यालयातील पोलिस व पोलिसेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Move through the way of the Constitution says SP Jadhav