धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी सेलूमध्ये अंदोलन 

विलास शिंदे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सेलू -धनगर समाजाचा अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतिने सोमवारी ( ता.१३) रोजी सेलू बंद पुकारण्यात आला होता.या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सेलू -धनगर समाजाचा अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतिने सोमवारी ( ता.१३) रोजी सेलू बंद पुकारण्यात आला होता.या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सकाळी दहा वाजता शहरातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासुन सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवुन क्रांती चौक, गोविंद बाबा चौक, स्टेशन रोड, बसस्थानक रोड, जिंतूर नाका मार्गे कार्यकर्त्यांचा जमाव "यळकोट यळकोट जय मल्हार" अशा घोषणाबाजी करत रायगड काॅर्नर येथे पोहचला. निदर्शने करत समाज बांधवांनी तहसिलदार स्वरुप कंकाळ यांना मागण्याचे निवेदन सादर केले.त्यानंतर धनगर आरक्षणासाठी गोमेवाकडी ( ता.सेलू ) येथील योगेश कारके या तरूणाने आत्महत्या केली होती.त्यास आंदोलनकर्त्यांनी श्रंद्धाजली वाहिली. दरम्यान बंद च्या पार्श्वभुमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वाहतुक मात्र सुरळित होती दुपारनंतर बाजारपेठ पुर्ववत सुरु झाली.

Web Title: Movement in Seleu to demand Dhangar community reservation