प्लास्टीक’ बंदीसाठी ` या ` देशात फिरणारा अवलिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

परभणी : ‘ग्रीन अर्थ, क्लीन अर्थ’साठी ‘से नो टू सिंगल युज प्लास्टीक’चा संदेश घेऊन येथील अवलिया, उच्चशिक्षीत शैलेश शेषराव कुलकर्णी यांनी नेपाळ, भुतान या दोन देशासह भारतीतील नऊ राज्यात दुचाकीवर साडेसहा हजार किलोमिटरचा प्रवास करून प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती करून मानवतेचा संदेश दिला.

परभणी : ‘ग्रीन अर्थ, क्लीन अर्थ’साठी ‘से नो टू सिंगल युज प्लास्टीक’चा संदेश घेऊन येथील अवलिया, उच्चशिक्षीत शैलेश शेषराव कुलकर्णी यांनी नेपाळ, भुतान या दोन देशासह भारतीतील नऊ राज्यात दुचाकीवर साडेसहा हजार किलोमिटरचा प्रवास करून प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती करून मानवतेचा संदेश दिला.

छंद हा माणसाला वेड लावतो. त्या धंदातून देशहिताचे, समाज हिताचे कार्य करणारे मात्र बोटावर मोजण्याइतकेच असतात. परभणीत असाच एक अवलिया असून त्यांची रायडींग ही पॅशन आहे. या आवडीतूनच त्यांनी आपल्या बुलेट मोटारसायकवर देशभर भ्रमंती विविध कारणाने भ्रमंती केली आहे. सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक एस. एम. कुलकर्णी यांचे चिरंजीव व अभियंते असलेले शैलेश कुलकर्णी यांना दुचाकीवर फिरण्याची मोठी हौस. या छंदाला त्यांनी समाजहिताची जोड दिली असून शासनाने दोन ऑक्टोबर रोजी घातलेल्या सिंगल युज प्लास्टीवर बंदीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी देशासह विदेशात जाऊन जनजागृती केली आहे.

दोन देश व नऊ राज्यात साडेसहा हजार किमी प्रवास

लायन्स क्लबचे सदस्य असलेल्या शैलेश यांनी  ता. ३० ऑक्टोबर रोजी या प्रवासाला सुरवात केली. तब्बल १४ दिवसानंतर ते मंगळवारी (ता.१२) रोजी दुपारी चार वाजता ते नागपुर मार्गे शहरात परतले. या दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रीत अनेक जिल्हे, तेलंगान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरीसा, धत्तीसगड, पश्चिम बंगाल आदीं जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयाने भेटी दिल्या. प्लास्टीच्या वापराचे दुष्परिणाम सांगीतले. स्वच्छतेची शपथ दिली. त्याच बरोबर त्यांनी नेपाळ देशातील तीन जिल्हे व भुतान देशातील दोन जिल्ह्यांना देखील भेटी देऊन तेथही स्वच्छतेची शपथ दिली.`

सैनिकांबरोबर देखील प्लास्टीक बंदीचा उहापोह

 भारत व बांगला देशादरम्यान असलेल्या सिमेवर वाघा सिमेवर ज्या पध्दतीने रिट्रीट होते, त्याचप्रमाणे संचलन सुरु झाले आहे. तेथील सैनिकांमध्ये देखील ते मिसळले, त्यांच्याशी प्लास्टीकबंदीबाबत चर्चा केली. त्याच बरोबर बांग्ला देशाच्या सैनिकांबरोबर देखील प्लास्टीक बंदीचा उहापोह केला. त्यांना देखील पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली. या १४ दिवसाच्या प्रवासात ते अनेक व्यक्तीं, समुहांशी जोडल्या गेले. ठिकठिकाणी लायन्स क्लबच्या सदस्यांसह शाळा, महाविद्यालयांनी देखील त्यांचे स्वागत केला तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे देखील आश्वासने दिली.

मोटार सायकल रायडींग माझी पॅशन आहे. त्या निमित्ताने नुसते फिरण्यापेक्षा समाजासाठी काही तरी करावे, समाजाला एखादा चांगला संदेश द्यावा, यासाठी हा प्रवास केला. या दरम्यान अतिशय चांगले व परिणामकारण अनुभव आले. त्यासाठी आई-वडीलांसह सासु-सासरे, पत्नी अपर्णा यांचे देखील मोठे पाठबळ लागले. लायन्स क्बलच्या मित्रांचे सहकार्य देखील मोठे होते.
शैलेश कुलकर्णी, परभणी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moving to this country for a plastic ban