एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षपदी इम्तियाज जलील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्यात जोरदार धडक देत विजयश्री खेचून आणणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपुर्ण महाराष्ट्र राज्याची जबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने पक्षाचे राष्ट्रीय सचिव सईद अहमद पाशा कादरी यांनी नियुक्ती पत्र काढले आहे. यासोबत राज्यातील तीन विभागांचे अध्यक्ष जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अकील मुजावर, विदर्भ-नाजीम शेख , मराठवाडा- फेरोज लाला तर मुंबई अध्यक्षपदी शाकेर पटणी यांची निवड करण्यात आली. 

महाराष्ट्रातील एकमेव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत एमआयएमने इतिहास घडवला. शिवसेनेच्या वीस वर्षाच्या सत्तेला हादरा देते इम्तियाज जलील निवडूण आले. 2014 मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आल्यापासून इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने जिल्ह्यात आपला जम बसवला. गेल्या अडीच तीन वर्षात एमआयएमने महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवत अडचणीत आणण्याचे काम केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Imtiaz Jalil appointed as a state president of MIM