खासदार इम्तियाज जलील यांना  अटक न झाल्यास रस्त्यावर उतरू - कदिर मौलाना 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

तोंडावर बुक्‍का पडल्यावर कळेल! 
आम्ही शहरात 20 वर्षापासून राजकारणात सक्रीय आहोत. मात्र, शहरात वातावरण खराब होणार नाही, याची विशेष काळजी घेत आलो. इम्तियाज हे चार दिवसात खासदार झालेत आणि त्यांना दोन दिवसाचा अनुभव आहे, त्यामुळे मला खूप कळते, अशा अर्विभावात त्यांनी वावरू नये, अन्यथा आमचा हात तोंडावर पडल्यावर काय होईल, हे सांगता येत नाही, असा इशाराही कदिर मौलाना यांनी दिला. 

औरंगाबाद - मतदान केंद्रावर राडा केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांनी येथे दिला. तसेच नगरसेवक होण्याची पात्रता नसलेल्या व्यक्‍तीला जनतेने खासदार करून संसदेत पाठवले. अशा व्यक्‍तींनी शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांनीच असे प्रकार सुरु केले, याबद्दल त्यांनी खंत व्यक्‍त केली. 

बुधवारी (ता.23) आयोजित पत्रकार परिषदेत कदिर मौलाना म्हणाले, की कटकटगेट परिसरात सुरवातीला एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्धीकी आणि महाआघाडीचे कार्यकर्ते यांच्यात किरकोळ वाद झाले होते. तेंव्हा आम्ही पुढाकार घेत शांतता भंग होऊ नये, म्हणून त्यांची समजूनही काढली.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebo..." width="560" height="280" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

मात्र, त्यांनी ही बाब खासदार इम्तियाज यांना सांगीतली असावी, त्यानंतर कट रचल्याप्रमाणे त्यांनी आमच्यावर हल्ला केला. प्रतिविरोध करताना खासदार इम्तियाज यांना कुणीतरी मारले. त्यांना मारल्याचे आम्हालाही वाईट वाटले. मात्र, शांततेसाठी पुढाकार घेण्याऐवजी जर असे राडे करणार असतील, तर लोक गप्प बसणार नाहीत त्यांना मारणारच, असेही कदीर मौलाना यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ता सुरजीतसिंग खुंगर, जिल्हाध्यक्ष विजय साळवे, व्दारकाभाऊ पाथ्रीकर, अफसरखान उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To MP Imtiaz Jalil Get off the road if not arrested - Kadir Maulana