नुकसान झालेल्या पिकांची खासदारांकडून पाहणी

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील

कायगाव (जि.औरंगाबाद) : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळावी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी, यासाठी लोकसभेत सरकारकडे पाठपुरावा करून आवाज उठवणार आहे, असे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. भिवधानोरा (ता. गंगापूर) येथे सोमवारी (ता. 11) दुपारी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.


भेंडाळा, गळनिंब, अगरवाडगाव, भिवधानोरा, जामगाव येथे भेट देत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कापूस, मका, सोयाबीनची पाहणी केली. दरम्यान, 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. भिवधानोरा येथे खासदारांच्या पीक नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी भाऊसाहेब शेळके, काकासाहेब म्हसरूप यांनी त्यांना नुकसानग्रस्त शेतात नेऊन पावसाने उद्‌ध्वस्त झालेले सोयाबीन पीक दाखवले. 100 टक्के नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई हेक्‍टरी 50 हजार रुपये द्यावी, पीकविमा द्यावा. तसेच शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागणीचे निवेदन खासदार यांना देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. भिवधानोरा ते धनगरपट्टी रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबद्दलही सांगितले.

यावेळी खासदार जलील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. लोकसभेत याविषयी बोलून शेतकऱ्यांना न्याय, दिलासा देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी गटविकास अधिकारी विजय परदेशी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष युसूफ सय्यद, सरपंच भाऊसाहेब नवरंगे, उपसरपंच आयुब शेख, राहुल वानखेडे, फैसल बासोलान, राजेंद्र चव्हाण, काशीनाथ धरपळे, प्रवीण बोकडिया, अस्लम सय्यद, मजीद शेख, मुसा पटेल, गणेश चव्हाण, राहुल खाजेकर, सत्तार शेख, झिशान पटेल, वसीम पटेल, पोलिस पाटील शिवाजी तांगडे, कृष्णा नवथर, संजय हिवाळे, समीर शेख, सलमान पठाण, अशोक म्हसरूप, भगवान सुखधान, हकीम शेख, अस्लम पठाण, दादा रहाटवाड, मंडळ अधिकारी बी. एन. सोनटक्के, तलाठी श्रीराम जोशी, प्रवीण इमामदार, कृषी सहायक एस. ए. उदे, एस. सी. सोनवणे आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com